Belgaum Stray Dogs: बेळगावात तब्बल १६ हजार मोकाट कुत्री

जिल्ह्यात २८ हजार कुत्र्यांची समस्या : वर्षभरात नियंत्रण आणणार
Stray Dog Issue
Stray Dog Issuepudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव शहरात तब्बल १६ हजार तर जिल्ह्यात सुमारे २८हजार मोकाट कुत्री असून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास पुढील वर्षभरात या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला आहे.

मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी असून लोकांनीही सहकार्य करणे गरज आहे. घराच्या बाहेर, इतरांच्या घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाद्य देऊ नये. प्रशासनाकडून कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी निश्चित ठिकाणे उपलब्ध करुन दिली जाणार असून त्याच ठिकाणी खाद्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

उद्याने, मैदाने आणि इतर सार्वजनिक जागांमध्ये कुत्र्यांना खाद्य देणे टाळावे. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशा परिस्थितीत केवळ शांत स्वभावाचे कुत्रेच तेथे येतील असे नाही तर आक्रमक कुत्र्यांमुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्व आक्रमक कुत्र्यांना एकाचवेळी पकडून हलवणे शक्य नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आक्रमक कुत्र्यांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र, हजारो कुत्र्यांसाठी एकाचवेळी मोठी सुविधा उभारणे व्यवहार्य नसल्याने सुरुवातीला ३०० ते ४०० कुत्र्यांच्या क्षमतेची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कुत्र्यांना पकडून शेल्टरमध्ये हलविण्याचे नियोजन आहे, असे रोशन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news