Belgaum Accident: हलग्‍याजवळ कारच्या धडकेत एक ठार

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील मागे बसलेला एकजण ठार झाला
Accident
Accident
Published on
Updated on

बेळगाव : भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील मागे बसलेला एकजण ठार झाला. बसवराज हणमंत शेट्याप्पगोळ (वय ५१, रा. सोमेश्वर गल्ली, अवरोळी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. ३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत माहिती अशी की, शंकर सोमनिंग तोफखाने (वय ३४, रा. अवरोळी) हे त्यांच्या दुचाकीवरून बसवराज शेट्याप्पगोळ यांना घेऊन धारवाडहून बेळगावला येत होते. हलगा गावाजवळील बाबुराव हॉटेलजवळ त्यांनी दुचाकी थांबवून पाऊस येत असल्याने दोघेही थांबले. यावेळी समोरून आलेल्या कारने बसवराज यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

बसवराज यांना आधी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यानंतर खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news