Belgaum Matka Gambling: शहरातील सराईत मटका बुकी हद्दपार

मटका बुकी म्हणून ८२ गुन्हे दाखल असलेल्या महम्मदशफी मोदीनसाब तहसीलदार याच्यावर अखेर कारवाई
Matka-Gambling
Matka-Gambling
Published on: 
Updated on: 

बेळगाव : शहरात २००३ पासून मटका खेळणे तसेच मटका बुकी म्हणून ८२ गुन्हे दाखल असलेल्या महम्मदशफी मोदीनसाब तहसीलदार (वय ६९, रा. खंजर गल्ली, बेळगाव) याच्यावर अखेर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

पोलिस उपायुक्तांनी गुरुवारी (दि. १३) याबाबतचा आदेश बजावला आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध कर्नाटक पोलिस कायद्यानुसार ८२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४९ प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. तसेच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सीआरपीसी/भारतीय नागरिक सुरक्षा संहितेंतर्गत १२ गुन्हे दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news