Gunji village house fire: गुंजीत घराला आग; लाखोंचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राहते घर भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. 5) दुपारी दोनच्या सुमारास गुंजीत (ता. खानापूर) घडली
house fire
house firePudhari
Published on
Updated on

खानापूर : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राहते घर भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. 5) दुपारी दोनच्या सुमारास गुंजीत (ता. खानापूर) घडली. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी झाली नाही. परंतु, रोख रकमेसह दागिने व गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास शंकर घाडी यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. घरातील लाकडी बांधकाम आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आग वेगाने पसरली. आगीचे लोट पाहून गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची भीषणता इतकी होती की पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या आगीत घाडी कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. घाडी यांनी आपल्या मुलाच्या कामासाठी अत्यंत कष्टाने 60 हजार रुपये रोख जमा करुन घरात ठेवले होते. दुर्दैवाने, ही सर्व रोकड आगीत जळून खाक झाली आहे. रोख रकमेसोबतच घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने आणि वर्षभराचा धान्याचा साठाही जळून कोळसा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news