

बेळगाव : खासगी शाळांच्या धर्तीवर आता सरकारी शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेवरील पकड मजबूत करण्यासाठी सरकारने इंग्रजी अध्यापन अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षण खात्याने इंग्रजी विषय शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभागाकडून (डीसीईआरटी) शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वीच शिक्षकांना अध्यापनासाठी तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुलांना इंग्रजीमध्ये सोप्या पद्धतीने कसे अध्यापन करावे, मुलांशी संवाद, विषय समजावून सांगणे आदीवर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारी शाळांतून आता एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे मुलांना इंग्रजी अधिक सक्षमपणे शिकवली जाईल.
काही जिल्ह्यांत प्रयोग
शिक्षण खात्याने काही जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वार ही संकल्पना राबवली आहे. त्याचे परिणाम सकारात्मक झाले आहेत. त्यामुळे तिचा विस्तार केला जाणार आहे. सरकारी शाळांतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. इंग्रजीकडे कल वाढल्याने सरकारी शाळांतूनही आता इंग्रजीचे धडे दिले जात आहेत.
शिक्षणावर लाखो रूपये खर्च
सरकारी शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. पहिली ते १२ वी पर्यंत मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. तसेच बसपास सुविधा देऊ केली आहे.