Belgaum Cylinder Theft : वीस लाखांच्या सिलिंडरची गोडाऊन कीपरकडून विक्री

गॅस सिलिंडर कंपनीत गोडाऊन कीपर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तब्बल २० लाखांचे गॅस सिलिंडर परस्पर विकल्याचा प्रकार बेळगावात उघडकीस आला
Cylinder Theft
Cylinder Theft
Published on
Updated on

बेळगाव : गॅस सिलिंडर कंपनीत गोडाऊन कीपर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तब्बल २० लाखांचे गॅस सिलिंडर परस्पर विकल्याचा प्रकार बेळगावात उघडकीस आला आहे. रोहीत लक्ष्मण चौगुले (रा. अष्टे, ता. बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने विकलेल्या सिलिंडरमध्ये रिकामे व भरलेल्या सिलिंडरचाही समावेश आहे.

मध्यंतरी इराण-अमेरिका इस्त्रायल युद्ध काळात सिलिंडरची टंचाई निर्माण झाली होती. घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री सुरु होती. गणेशपूर महालक्ष्मीनगर येथे एका गॅस कंपनीचे गोडाऊन आहे. रोहीत हा येथे गोडाऊन कीपर म्हणून काम करतो.

१ एप्रिल ते जून २०२६ या काळात त्याने येथील सिलिंडरची व्यवस्थापनाला अंधारात ठेवून विक्री केली. यामध्ये घरगुती १४७ रिकामे सिलिंडर व ५७ भरलेले सिलिंडर तसेच व्यावसायिक भरलेले १५९ व रिकामे १५७ सिलिंडर, ५ किलोच्या भरलेल्या १२ सिलिंडरचा समावेश आहे. याची किंमत २० लाखाहून अधिक होते. टंचाईच्या काळात फायदा उठवत संशयिताने हा प्रकार केला आहे.

या प्रकरणी कंपनीचे भागीदार जमशेद मेहता यांनी कॅम्प पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार रोहितविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक आनंद वणकुद्रे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news