Belgaum News : बेळगावात होणार इकॉनॉमी ॲक्सेलेटर प्रोग्रॅमअंतर्गत जागतिक तंत्रज्ञान केंद्रे

राज्य सरकारची मंजुरी : व्‍हीटीयू परिसरात स्‍थापन होणार, हुबळीतही जीटीसी, स्टार्टअप्ससाठी पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
Priyank Kharge
Priyank Kharge
Published on: 
Updated on: 

बंगळूर : तंत्रज्ञान केंद्रांचा विस्तार बंगळूरबाहेर करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकारने बेळगाव आणि हुबळी येथे जागतिक तंत्रज्ञान केंद्रे (ग्लोबल टेक्नॉलॉजिकल सेंटक-जीटीसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावातील तंत्रज्ञान केंद्र व्हीटीयू परिसरात उभारले जाणार आहे. गृह तसेच आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

मंत्री खर्गे म्हणाले, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या लोकल इकॉनॉमी ॲक्सेलेटर प्रोग्रॅमअंतर्गत ही केंद्रे स्थापन केली जात आहेत. बंगळूरबाहेर तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किओनिक्सच्या माध्यमातून बेळगाव, मंगळूर व हुबळी येथे ‘प्लग अँड प्ले’ सुविधांसह नवीन जागतिक तंत्रज्ञान केंद्रे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता सरकार कार्यवाही करत आहे.

बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात सुमारे १० हजार चौरस फूट क्षेत्रफळात ‘प्लग अँड प्ले’ सुविधांसह जागतिक तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ८३ लाख खर्च करून हे केंद्र स्थापन केले जाणार असून कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या परिसरातच हे केंद्र स्थापन होत असल्यामुळे शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्र व उद्योग यांच्यातील संपर्क आणखी मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थी, स्टार्टअप्स व तंत्रज्ञानाधारित उद्योगांसाठी आवश्यक वातावरण स्थानिक पातळीवरच निर्माण करणे हा यामागील उद्देश असल्याचे खर्गे यांनी सांगितले. हुबळीच्या आयटी पार्कमध्ये सुमारे १० हजार चौरस फूट क्षेत्रफळात जागतिक तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले जाणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ५.८० कोटी खर्च होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news