

अंकली : विजेचा धक्का लागून घराच्या छतावरून पडल्याने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री इंगळी गावात घडली. सानवी कांबळे असे त्या मुलीचे नाव आहे.
सानवी येथील सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी घरी खेळत असताना दोरी उडीची दोरी घरावरील विजेच्या तारेवर पडली. ती दोरी काढण्यासाठी सानवी वरच्या मजल्यावर गेली असता तिला विजेचा धक्का बसला. त्यानंतर ती घराच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाली.
तिला तातडीने उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद अंकली पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.