Belgaum fuel shortage rumor: अफवेच्या वणव्यावर टँकरची फुंकर

बेळगावात पेट्रोल टँकर दाखल
Belgaum fuel shortage rumor
Belgaum fuel shortage rumorPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शहरात सोमवारी रात्री पेट्रोल व डिझेल मिळेनासे झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पंपावर गर्दी उसळली होती. तथापि, मंगळवारी बेळगावातील काही पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचे टँकर दाखल झाल्याने गर्दी ओसरली. पंपमालकांनीही पुरेसे पेट्रोल असल्याचे स्पष्ट केले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात कुठेच टंचाई नसल्याचे सांगून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

सोमवारी सोशल मीडियावरील अफवांमुळे लोकांची तारांबळ उडाली. दुचाकी व चारचाकीमध्ये इंधन भरून घेण्यासाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी रात्री काही पंपांवरील इंधन संपले. रात्री ग्रामीण भागात तसेच काही उपनगरांत पंपांवर ‌‘नो स्टॉक‌’चे फलक लागले. त्यामुळे घाबरगुंडी उडून लोकांनी पंपांवर गर्दी केली. तसेच मिळेल त्या ठिकाणी धाव घेत नेहमीपेक्षा जादा इंधन भरून घेतले. त्यामुळेही स्थिती गंभीर बनली होती. तथापि, मंगळवारी बेळगावात टँकर दाखल झाले. त्यामुळे दुपारनंतर सर्व पेट्रोलपंपांवर गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, पॉवर पेट्रोलचा दर 110 रुपयांवरून 112 रुपये करण्यात आला आहे. साधे पेट्रोल आधीप्रमाणेच 102 रुपये लिटर या दराने उपलब्ध आहे.

सीएनजी गॅस चढ्या भावाने

शहरात सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा व चारचाकी गाड्यांची संख्या मोठी आहे. सीएनजी 52 रुपये किलो दराने मिळत होता, तो आता 72 रुपये किलो झाला आहे. सीएनजी गॅस 14 रुपयांनी महागला असून तो मुबलक प्रमाणात मिळत आहे.

शहरातील पेट्रोल व डिझेलची टंचाई नाही, अशी माहिती खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पुरेसा साठा शहरात उपलब्ध असून अफवावर विश्वास ठेवू नये.
-फिरोज सेट, माजी आमदार, पेट्रोल पंपमालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news