Karnataka Government: सगळ्याच विद्यार्थ्यांना मोफत बस पास

वितरण सुरु, सरकारकडून नियमावली जाहीर, सिंधू ॲपवर अर्जाचे आवाहन
Karnataka Government: सगळ्याच विद्यार्थ्यांना मोफत बस पास
Published on
Updated on

बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या मंित्रमंडळ बैठकीत सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस देण्याचा निर्णय घेतला होता. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सुमारे ७० हजार मुलांना त्याचा लाभ मिळणार आहे. शनिवारी बेळगाव बस स्थानकामध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत बसचे वितरण सुरु झाले.

राज्यात शक्ती योजनेअंतर्गंत फक्त महिलांनाच बस प्रवास मोफत होता. आता सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि महाविद्यालयापर्यंत मोफत बस पास देऊ केला आहे. सिंधू पोर्टलवर अर्ज करून मोफत बस पासची सुविधा मिळणार आहे.

परिवहन खात्यातर्फे मोफत बस वितरण शनिवारपासून सुरू झाले. राज्याच्या सीमवेर राहून कर्नाटकात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळणार आहे. यापूर्वी परिवहनकडे अर्ज केलेल्या मुलांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत. परिवहनच्या अधिकाऱ्यांना १५ दिवसात पैसे परत करावे लागणार आहेत.

परिवहन महामंडळाला विद्यार्थ्यांना मोफत बसपास वितरणासाठी नियमावली पालन करावे लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेचे निकष, अंतराची मर्यादा, विद्यार्थी बसपासचा कालावधी आदी नियम लागू होतील. सेवा सिंधूच्या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांनी ेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news