Belgaum Theft: घरफोड्या करणाऱ्या पाच चोरट्यांना अटक

पाऊण कोटीचा मुद्देमाल जप्त : बेळगाव परिसरात घरफोड्या
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या पाच चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 65 लाखांचे 416 ग्रॅम सोन्याचे दागिने व चार लाखांच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे, ही माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये रिहान मैनुद्दिन डफेदार ऊर्फ पठाण (वय 18, रा. वैभवनगर), मलिक खलील हुब्बळ्ळी (वय 26, रा. वीरभद्रनगर, पहिला क्रॉस), अरमान अकबर शेख (वय 18, मूळ रा. जुगाईनगर, मासाब कुडची, ता. रायबाग, सध्या रा. वीरभद्रनगर कोयला हॉटेल पाठीमागे), खलील इस्माईल हुब्बळ्ळी (वय 57, रा. वीरभद्रनगर पहिला क्रॉस, बेळगाव) व शहानवाज सिराजुद्दीन पठाण (वय 23, वीरभद्रनगर, बेळगाव) यांचा समावेश आहे.

सदर संशयितांनी अमननगर, उज्वलनगर, मारुतीनगर, शाहुनगर व वीरभद्रनगर येथे चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे सखोल तपास केला असता सर्व संशयित सापडले.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी, वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी निरंजनराजे अर्स, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आले. गड्डेकर यांच्यासह उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, सहायक उपनिरीक्षक उदय पाटील, पी. एम. मोहिते, बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, बी. एम. कल्लप्पन्नवर, सी. जे. चिन्नप्पगोळ, के. बी. गौराणी, सी. आय. चिगरी, महेश वडेयर, मल्लिकार्जुन गाडवी यांनी या प्रकरणाचा तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news