Belgaum: 'शिवम'विरुद्ध गुंतवणूकदाराकडून पहिली तक्रार

पाच लाखांची गुंतवणूक; ३६ टक्के व्याजाचे आमिष; कागवाड पोलिसांत फिर्याद
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव शहरस्थित शिवम असोसिएटस्‌ कंपनीचा मालक शिवानंद नीलण्णावरच्या विरोधात कंपनीच्या गुंतवणूकदाराकडून पहिली तक्रार मंगळवारी दाखल झाली. कागवाड पोलिस ठाण्यात कृष्णा अप्राज यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याआधी सहकार खात्याने शिवानंदविरुद्ध माळमारुती पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर त्याला अटक झाली असून, मंगळवारी सीआयडीने त्याला बंगळूरला हलवले. तेथे त्याची काही दिवस सीआयडीकडून चौकशी होणार आहे.

कृष्णा यांच्या तक्रारीनुसार, शिवानंदने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कृष्णा अप्राज यांच्याकडून ५ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. गुंतवलेल्या रकमेवर तब्बल ३६ टक्के व्याज देण्याचे तसेच एप्रिल महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने मुद्दल परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवबसवनगर येथील शिवम असोसिएटस्‌ संस्थेवर गेल्या शनिवारी महसूल, सहकार आणि पोलिस विभागाने संयुक्त छापा टाकला होता. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई सुरू झाली आहे. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, बँक व्यवहार आणि गुंतवणुकीची माहिती तपासली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news