

बेळगाव : शेतात भात रोप लावण करताना एका शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ९) मण्णूरमध्ये (ता. बेळगाव) घडली.
मनोहर बाळकृष्ण चौगुले (वय ५५, रा. रेणुका गल्ली, मण्णूर) असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मार्कंडेय नदीची पाणी पातळी रविवारी कमी झाली. यामुळे नदीकाठावरील असलेल्या शेतात भातरोप लावणचे काम मनोहर करत होते.
यादरम्यान रविवारी दुपारी चार वाजता त्यांचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते देवस्थान कमिटीचे सदस्य होते.