Belgaum News : मच्छेत पाणंदीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा कोरड्या पाणंदीत पडून मृत्यू झाला
Belgaum News : मच्छेत पाणंदीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Published on
Updated on

बेळगाव : शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा कोरड्या पाणंदीत पडून मृत्यू झाला. रविवारी (दि. २०) सकाळी मच्छे शिवारात ही घटना घडली. सुनील जिन्नाप्पा पाटील (वय ५९, रा. पाटील गल्ली, मच्छे, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सुनील पाटील रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मच्छे शिवारातील शेतात चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी हातातील डबा कोरड्या पाणंदीत पडला. तो वाकून घेण्याचा प्रयत्न करताना ते पाणंदीत पडले. या पाणंदीत मोठमोठे दगड असून त्यांना आदळून ते गंभीर जखमी झाले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

सकाळी ११ वाजता डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news