Belgaum Accident : बसखाली सापडून माजी सैनिक ठार

गणेशपूरजवळ कुत्रे आडवे आल्याने अपघात
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : कुत्रे आडवे आल्यामुळे दुचाकीचे दोन्ही ब्रेक अचानक दाबल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या माजी सैनिकाच्या अंगावरून बस गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास गणेशपूर रोडवरील चव्हाण हॉस्पिटलजवळ उतरतीला हा अपघात घडला.

नारायण रामचंद्र पाटील (वय ६०, मूळ रा. होनकल, ता. खानापूर, सध्या रा. पहिला क्रॉस सरस्वतीनगर, गणेशपूर) असे मृताचे नाव आहे. रहदारी दक्षिण विभाग पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : कामानिमित्त बेळगावला आलेले नारायण घरी निघाले होते. पाठीमागून बेळगावहून बेनकनहळ्ळीकडे बस निघाली होती.

चव्हाण हॉस्पिटलज‍वळ नारायण यांच्या दुचाकीपुढे एक कुत्रा अचानक आडवा आला. त्यामुळे त्यांनी दुचाकीचे दोन्ही ब्रेक दाबले. त्याबरोबर दुचाकी घसरली आणि उजव्या बाजूला कलंडली. त्यामुळे नारायण रस्त्यावरच पडले आणि पाठोपाठ असलेल्या बसच्या चाकाखाली सापडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी मिळवले आहे. बसचालक अशोक एम्मी (रा. हुलीकट्टी) यांच्याविरोधात रहदारी दक्षिण पोलिसांत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला असून, निरीक्षक बसगौडा पाटील पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.