Belgaum Jewellery Theft : पर्समधील दागिने चोरणाऱ्या वृद्धेला अटक

सुमारे अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार लंपास
Belgaum Jewellery Theft : पर्समधील दागिने चोरणाऱ्या वृद्धेला अटक
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बाजारपेठेत फिरणाऱ्या महिलेच्या पिशवीतील पर्स चोरून त्यातील साडेतीन लाखाचा सुमारे अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरणाऱ्या वृद्ध महिलेला हारूगेरी पोलिसांनी अटक केली. सुलोचना सिद्धाप्पा लोंढे (रा. कागवाड) असे संशयित महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, ७ ऑक्टोबर रोजी शांतव्वा आप्पासाब मोरे (वय ४५, रा. जनता प्लॉट हारूगेरी ही महिला हारूगेरी येथील बाजारपेठेत गेली होती. भाजीपाला खरेदी करत असताना दागिना ठेवलेली पर्स भाजीपाल्याच्या पिशवीत होती. सदर महिला केळी घेत असताना संशयित सुलोचना हिने त्यांच्या पिशवीतील पर्स लांबवली.

या प्रकरणाचा तपास हारूगेरी पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांनी सदर महिलेला अटक करून तिच्याकडून दागिना, ८०० रूपये जप्त केले. हारूगेरीचे निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ, उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.