Belgaum Crime : कौटुंबिक वादातून वृद्धाकडून पत्नीचा खून

रायबाग तालुक्यातील घटना : शेतात विळ्याने केले वार
Murder
MurderPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : कौटुंबिक वादातून एका ६७ वर्षीय वृद्धाने पत्नीचा खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील मुडलगी गावात गुरुवारी (दि. १) उघडकीस आली. कल्लव्वा सदाशिव मरडी (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून. याप्रकरणी तिचा पती सदाशिव रामा मरडी (वय ६७) याच्यावर खुनाचा संशय आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी दिली.

मुडलगी परिसरातील उसाच्या शेतात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून सदाशिवने पत्नी कल्लव्वावर विळ्याने वार केल्याचे समोर आले आहे. सदाशिव आणि कल्लव्वा यांना चार मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये विविध कारणांवरुन वारंवार वाद होत होती. जेवण व्यवस्थित बनवत नसल्याच्या कारणावरुनही त्यांच्यात वाद होत असल्याचे सांगण्यात आले.

गुरुवारी दोघे शेतात गवत आणण्यासाठी गेले असताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी सदाशिवने कल्लव्वावर विळ्याने वार केला. त्यात कल्लव्वा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर उसाच्या शेतात कल्लव्वाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news