Belgaum Police Raid: सराईत गुन्हेगारांच्या घरावर पहाटे छापासत्र

८.५ लाख, १० वाहने, शस्त्र जप्त
police raid
police raidpudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : उत्तर विभाग पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांतील सराईत गुन्हेगारांच्या घरांवर एकाचवेळी छापेमारी केली. या विशेष मोहिमेत तब्बल ४५६ सराईत गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून ८.५ लाखांची रोकड आणि कागदपत्रे नोंदणी क्रमांक असलेली दहा वाहने व दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.

उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, डीवायएसपी पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला होता. पहाटेच ही कारवाई करण्‍यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत अनेक संशयितांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. तसेच विविध न्यायालयांनी जारी केलेल्या वॉरंटवरील दोन फरार असलेल्या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या रोकड, वाहनांची कागदपत्रे आणि शस्त्रांबाबत सखोल चौकशी सुरू असून संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news