Belgaum Murder Case : भाच्यांकडून मावशीसह दोघांचा खून

१० एकर जमिनीच्या वादातून हत्याकांड; दोघांना अटक
murder case
murder casePudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : दहा एकर जमिनीच्या वादातून दोन भाच्यांनी आपल्या मावशीसह तिच्या पुतण्याचा कोयता-कुऱ्हाडींनी खून केला आहे. त्याबद्दल दोघांचा शोध सुरू असून, हल्ल्यात आणखी कोणी सहभागी होते का, हाही तपास सुरू आहे. यरगट्टी तालुक्यातील जीवापूर गावात शुक्रवारी सकाळी हे हत्याकांड घडले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांनी भेट देऊन पाहणी केली.

बसव्वा भीमप्पा नायकर (वय ६०) आणि रमेश हनुमंत नायकर (२९) अशी मृतांची नावे आहेत. बसव्वाच्या दोन बहिणींची मुले रवी आणि पुंडलिक अशी हल्लेखोरांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी जीवापूरला बसव्वाच्या घरी जाऊन तिच्यावर हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी तिच्या दिराचा मुलगा रमेश धावला. मात्र त्याच्यावरही रवी आणि पुंडलिक यांनी कोयत्यांनी वार केले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर रवी आणि पुंडलिक यांनी पलायन केले.

पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, बसव्वाचे तिच्या बहिणी आणि भावांशी वडिलोपार्जित मालमत्तेवरून भांडण होते. गेल्या दहा वर्षांपासून हा वाद सुरू होता. अधूनमधून त्यांच्यात खटकेही उडत होते. गुरुवारी रात्री वाद मिटवण्यासाठी जीवापूर गावात संबंधितांची बैठक बोलावण्यात आली होती.

शोध घेण्याचे काम सुरू

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मालमत्तेच्या वादाचे स्वरूप, हत्येमागील कारण आणि या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून दोघांचा जीव गेल्याने जीवापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.