Belgaum Crime | दरबार गल्ली खून : मुख्य संशयिताच्या भावासह दोघांना अटक

अटकेतील एकूण संख्या तीनवर
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

बेळगाव : आठवड्यापूर्वी दरबार गल्लीत झालेल्या मारहाणीत रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी मुख्य संशयिताला अटक केली होती. आता मुख्य संशयिताचा भाऊ आणि एक अल्पवयीन युवक अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या खूनप्रकरणी अटकेतील संशयितांची संख्या तीनवर पोचली आहे.

अदनान अरिफ नायकवाडी (28, जालगार गल्ली) आणि अन्य एका अल्पवयीन युवकाचा गुरुवारी अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. अदनान हा मुख्य हल्लेखोर अयान अऱिफ नायकवाडी याचा भाऊ आहे. अयानला पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती. 13 एप्रिलरोजी क्षुल्लक कारणातून फजल महंमद डफेदार (वय 56, रा. वीरभद्रनगर) यांच्यावर हल्ला झाला होता. सहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अयानला (वय 26, रा. खंजर गल्ली) अटक केली होती.

खुनी हल्ला खुनात रूपांतरित झाल्याने मार्केटचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी हे गांभीर्याने तपास करत आणखी दोघांना अटक केली. निरीक्षक कालीमिर्ची तपास करीत आहेत. दरबार गल्ली, खंजर गल्ली परिसरातील गुंडगिरी बंद करा, अशी मागणी करत या परिसरातील रहिवाशांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news