Belgaum crime: किरकोळ वादातून युवकावर खुनी हल्ला

बोरगाव येथील घटना
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

बोरगाव : किरकोळ वादातून बोरगाव येथे युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना मंगळवार दि. 26 रोजी साडेसहाच्या सुमारास घडली. पांडू वसवाडे (वय 37) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवकास पुढील उपचारासाठी सांगलीतील सिव्‍हिल हॉस्पिटलमध्‍ये हलविण्यात आले आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवार दि. 25 रोजी सायंकाळी शहरातील तळवार कोडी येथे युवकांमध्ये किरकोळ वाद झाला होता. काही नेत्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवला होता. मंगळवारी सायंकाळी तळवार कोडी येथील पांडू वसवाडे हा युवक किराणा साहित्‍य आणण्यासाठी बोरगाव येथे येत असताना केईबीनजीक दोघांनी पांडूवर धारधार शस्त्राने हल्‍ला केला. या हल्ल्यात पांडू गंभीर जखमी झाला. हल्ला केल्‍यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

ही माहिती समजताच पांडूचे नातेवाईकांनी तातडीने त्‍या ठिकाणी दाखल झाले व त्‍यांनी शहरातील एका खासगी हॉस्पिटल उपचारासाठी पांडूला दाखल केले. पण प्रकृती गंभीर बनल्याने त्याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्‍ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्‍याने पुढील उपचारासाठी सांगलीमधील सिव्हिल हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली. रात्री उशिरा सदर घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news