

बेळगाव ः गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध प्रकरणांतर्गत 461 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक 210 गुन्हे अंमली पदार्थविरोधी कारवाईचे आहेत. सन 2024 मध्ये अवघे 55 गुन्हे दाखल झाले होते. उघड्यावर शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांनाही पोलिसांनी लक्ष्य केले असून वर्षभरात 30 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून अंमली पदार्थविरोधी तसेच बेकायदेशीर मटका, जुगार याविरोधातही मोहीम उघडली. गेल्या वर्षभरात मटकाप्रकरणी 131 जणांवर कारवाई केली आहे. तसेच जुगारासंबंधी 27 प्रकरणे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाली आहेत.
आकडे बोलतात
गुन्ह्याचे प्रकार 2024 2025
मटका 99 131
जुगार 25 27
बेटिंग 1 1
बेकायदेशीर दारू 44 44
बेकायदेशीर शस्त्रास्त्र 3 30
वसुलीसाठी छळ 1 4
एनडीपीएस 55 210