Belgaum Crime : मालमत्तेसाठी तो खून पत्नी, मुलाकडूनच

हिरेनंदीहळ्ळी खून प्रकरणाचा झाला उलगडा; चौघांना अटक
Belgaum Crime News
मालमत्तेसाठी तो खून पत्नी, मुलाकडूनच
Published on
Updated on

बेळगाव : कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात एकाचे गुप्तांग कापून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. हा खून मालमत्तेसाठी त्याच्या पत्नी व मुलाने गावातील दोघांना सुपारी देऊन केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी कित्तूर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.

महेश मडीवाळप्पा अंबण्णावर (वय 32), मुदकाप्पा पद्मराज कोलेकर (30), मृताची पत्नी कस्तुरी कलमेश कोटी (42), मुलगा किरण कलमेश कोटी (25, सर्व रा. हिरेनंदीहळ्ळी, ता. कित्तूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौघांनी कलमेश शंकराप्पा कोटी (50) याचा दि. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खून केला. याप्रकरणी हिरेनंदीहळ्ळी येथील चंद्रशेखर हनमनाळ यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलमेश याचा काही वर्षांपूर्वी कस्तुरी हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना किरण हा मुलगाही आहे. दहा वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर कस्तुरी त्याला सोडून मुलगा किरण याला घेऊन तरघट (ता. कुंदगोळ) येथे राहत होती. कलमेश हा तुमकूर येथे होमकेअर म्हणून काम करत होता. दहा दिवसांपूर्वी तो गावी परतला होता. तो आपल्या आईकडे राहत होता. शनिवार, दि.21 रोजी कलमेशचा मृतदेह गावाजवळील मक्याच्या शेतात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रारंभी त्याची ओळख पटली नाही. पोलिसांनी तपास केला असता, तो मृतदेह कलमेशचा असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कित्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवून दिला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संशयित कस्तुरी आणि मुलगा किरण हेदेखील उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेऊन वरील

संशयितांना अटक केली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन आणि अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रामगौंड बसर्गी, बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी विरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवानंद गुडनट्टी, उपनिरीक्षक प्रवीण, उपनिरीक्षक जी.जी. हंप्पण्णावर, आयएसआय आर. के. गेंजेरी, बी. वाय. उपरट्टी, आर. एस. शीला, एम. बी. कम्बार, ए. एम. चिक्केरी, एम. आर. लम्मानी, एस. एम. मुरगोड, एस. पी. तिप्पणावर, जी. एस. सलीमठ, जे. जी. पाटील, एल. के. कुंभार, एस. ए. पाटील आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news