Belgaum municipal corporation: मनपा उभारणार बायोगॅस निर्मिती प्रकल्प

राज्य सरकार करणार 100 कोटी खर्च : 10 एकर जागा मंजूर
Belgaum Municipal Corporation
Belgaum Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांमधील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोज 215 टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपये खर्च करून 150 टन क्षमतेचे गॅस उत्पादन युनिट उभारण्याकरिता 10 एकर जमीन देण्यास मंजुरी दिली आहे.

शहरात रोज कचरा समस्या डोक वर काढत आहे. तुरमुरी कचरा संकलन करार संपला असल्याने तुरमुरी पंचक्रोशीतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या बाहेरील भागात जमीन शोधण्यासाठी पावले उचलली आहेत.

नवा प्रकल्प स्वच्छता आणि आरोग्याच्यादृष्टीने एक मोठे पाऊल ठरेल. कचरा विल्हेवाट योग्य प्रकारे होईल, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल. या युनिटमध्ये दररोज सुमारे 4 ते 5 टन बायोगॅस आणि अंदाजे 10 टन सेंद्रिय खत तयार होणार आहे. गॅसचा वापर हॉटेल उद्योग, तसेच इतर क्षेत्रांसाठीही करण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news