Chikodi House Burglary : एकाच रात्रीत फोडली चार घरे

चिकोडीतील घटना : सोन्‍याचे दागिने, रोकड लंपास
Chikodi House Burglary
Chikodi House Burglary
Published on: 
Updated on: 

चिकोडी : चार घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रक्कम लंपास केली आहे. एकाच रात्रीत चार घरे फोडण्यात आली आहेत. शहरातील हालट्टी येथे बंद असलेल्या घरांना लक्ष्‍य करत चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

हालट्टी येथील एम. के. कवटगीमठ कन्व्हेंशनल हॉलच्या मागील बाजूला असलेल्‍या काकासाहेब चन्नवर, बसवराज चन्नवर व बसवाणी नेसर्गी यांची घरे फोडण्‍यात आली. काकासाहेब चन्‍नवर हे जुन्या घराला कुलूप लावून नव्या घरात झोपले होते. चोरट्यांनी त्‍यांच्‍या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीन लाख रुपये लंपास केले. बसवराज चन्‍नवर हे कामानिमित बळ्‍ळारीला गेले होते. चोरट्यांनी त्‍यांच्‍या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील अर्धा तोळ्याचे दागिने, अर्धा तोळ्याची सोनसाखळी व ६ अंगठ्या लंपास केल्या.

तसेच, बसवाणी नेसर्गी व त्यांची पत्नी कार्यक्रमानिमित्त कित्तूरला गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्‍यांच्‍या घरातील २५ हजार रुपये बोरमाळ व सोनसाखळी असे ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्‍यानंतर हालट्टी परिसरातील हेस्कॉम पोलिस ठाण्यासमोरील मसरगुपी यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचा नेकेलेस लंपास केला. घटनेची माहिती मिळताच चिकोडी डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, सीपीआय विश्वनाथ चौगुले, पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासासाठी पोलिसांनी श्वान पथक व ठसेतज्‍ज्ञ पथकाला पाचारण केले. याप्रकरणी चिकोडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.