Belgaum Accident: कार-डंपर अपघातात वडील ठार, मुलगा जखमी

कार व डंपरमध्ये झालेल्या अपघातात वडील ठार तर मुलगा जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हत्तरवाट क्रॉसजवळ घडली
accident
accidentfile photo
Published on
Updated on

चिकोडी : कार व डंपरमध्ये झालेल्या अपघातात वडील ठार तर मुलगा जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हत्तरवाट क्रॉसजवळ घडली. अब्दुल सत्तार पटेल (वय ७८) असे मृताचे नाव आहे. तर मुलगा मौलाना नोमान पटेल जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी झाला.

याबद्दल अधिक माहिती अशी, करोशी येथील रहिवासी निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल सत्तार पटेल व त्यांचा मुलगा मौलाना नोमान पटेल हे आपल्या कारमधून कोल्हापूरहून करोशीकडे परत येत होते. ते हत्तरवाट क्रॉसजवळ आले असता कार व डंपरमध्ये अपघात झाला.

या अपघातात जखमी झालेल्‍या पिता-पुत्रांना चिकोडी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, अब्दुलसत्तार पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापतीमुळे रक्तस्त्राव होऊन प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे बेळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मौलाना नोमान पटेल यांच्यावर चिकोडी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्‍यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news