बेळगाव : समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. रमेश फकीराप्पा होरकेरी (वय ३१, रा. पट्टदकल्ल गल्ली, सौंदत्ती) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावरील जुगूळभावीजवळ हा अपघात घडला.
कारचालक बाशा मोईद्दिन ब्यारी (वय ५३, रा. गोकाक फॉल्स्) हा कार घेऊन सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्याने जुगूळभावी कमानगेटकडे निघाला होता. समोरून आलेल्या दुचाकीची व कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रमेशच्या पोटाला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
बाशावर निष्काळजीपणाचा गु्न्ह सौंदत्ती पोलिसांत दाखल झाला आहे. उपनिरीक्षक के. एम. बन्नूर तपास करीत आहेत.