Belgaum Accident: कार- ट्रॅव्हलर अपघातात १९ जण जखमी

पुणे-बंगळूर महामार्गावर सोलापूर फाट्याजवळ अपघात : जखमी इचलकरंजीचे
Belgaum Accident: कार- ट्रॅव्हलर अपघातात १९ जण जखमी
Published on
Updated on

संकेश्‍वर : कार व ट्रॅव्हलरमध्‍ये झालेल्‍या अपघातात १९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर फाट्यावर घडली. ट्रॅव्हलरला मागून कारने जोरात धडक दिल्‍याने ट्रॅव्‍हलर दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात इचलकरंजी येथील १९ जण जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, विवाह समारंभासाठी इचलकरंजी येथील रहिवासी ट्रॅव्हलरने शिंदेवाडीला जात होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर फाट्याजवळ पाठीमागून आलेल्‍या कारने ट्रॅव्हलरला जोरात धडक दिल्याने ट्रॅव्‍हलर दुभाजकाला धडकून उलटली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. न ट्रॅव्हलरमधील १९ जण जखमी झाले आहेत. वैशाली बिंरजे, स्वाती बिंरजे, शीतल बिंरजे, आनंदी बिंरजे, वैष्णवी बिंरजे, सोनू पोवार, मंगल बिंरजे, राणी पोवार, विद्या सूर्यवंशी, क्षितिजा सूर्यवंशी, सुमन हंडे, नुरजा मुजावर, सुनीता मेडे, वैभवी फडणीस, मुक्ता माने, वैशाली डोंगळे, सारंग यादव, शौर्या बिंरजे, चालक आदित्य कांबळे (सर्व रा. इचलकरंजी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

किरकोळ जखमींवर संकेश्वर शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले असून, अधिक उपचारासाठी इचलकरंजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैशाली बिंरजे, शीतल बिंरजे, राणी पोवार, सुनिता मेडे व सारंग यादव गंभीर जखमी असल्याने त्यांना कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेला कार चालक संदीप कामत यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिस निरीक्षक शिवशरण आवजी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news