Belgaum Accident: कारच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

घरातून खेळत बाहेर आलेल्या दोन वर्षांच्या बालकाचा रस्त्यावरुन जाणाऱ्या कारची धडक बसल्याने मृत्यू झाला
Accident
Accident
Published on
Updated on

खानापूर : घरातून खेळत बाहेर आलेल्या दोन वर्षांच्या बालकाचा रस्त्यावरुन जाणाऱ्या कारची धडक बसल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. १०) दुपारी चारच्या सुमारास कक्केरीतील (ता. खानापूर) गावठाण गल्लीत हा अपघात घडला. तोहीद तन्वीर कक्केरी असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.

याबाबत नंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मन्सूर कक्केरी हे मयत बालकाचे काका त्यांची स्विफ्ट कार घेऊन अळणावरच्या बाजारला जात असताना अचानक तोहीद रस्त्यावर आला. तो रस्त्यावर आलेला कारचालक मन्सूर यांच्या निदर्शनास आला नाही.

कारची धडक बसल्याने तोहीद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने हल्याळमधील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. नंदगड पोलिसांत निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news