Belgaum Accident: बसची झाडाला धडक; दोन प्रवासी जखमी

स्टीअरिंग लॉक झाल्याने अपघात
Belgaum Accident: बसची झाडाला धडक; दोन प्रवासी जखमी
Published on
Updated on

खानापूर : अचानक स्टीअरिंग लॉक झाल्याने बस झाडाला धडक बसून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने समोरुन कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला. खानापूर-बिडी मार्गावरील बेकवाड ते बिडी गावांच्या दरम्यान एका धोकादायक वळणावर बुधवारी (दि. २०) सायंकाळी हा अपघात झाला.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्याळ–बेळगाव बसचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, बस रस्त्याच्या डाव्या बाजूने घसरत विरुद्ध दिशेला जाऊन झाडाला जोरात धडकली.

अपघातावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news