Belgaum Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील भाऊ-बहीण ठार

पुणे-बंगळूर महामार्गावरील कणगले हद्दीतील घटना
Accident
Accident
Published on
Updated on

संकेश्वर : मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील भाऊ-बहिण ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी दहाच्या सुमारास घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कणगलेच्या हद्दीत हा अपघात झाला. आप्पासाहेब महालिंग लाटकर (वय ६०, रा. कणगले) व सुवर्णा सत्याप्पा पाटील (वय ६२, रा. मागनूर, ता. चिकोडी) यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आप्पासाहेब लाटकर सुवर्णा पाटील यांना त्यांच्या सासरवाडीतून माहेरी कणगले गावी दुचाकीवरुन घेऊन येत होते. म्हसोबा हिटणी-कणगलेमार्गे आपल्या शेतातील घराकडे जात असताना निपाणीहून बेळगावकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात आप्पासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला तर सुवर्णा यांच्या दोन्ही पायांवरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पण, उपचार सुरु असताना त्यांचाही मृत्यू झाला. आप्पासाहेब हे शेतकरी होते. कणगले गावच्या सीमेवर शेतातच त्‍यांचे आहे. घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news