Belgaum municipal corporation: शहरातील बी खाता मालमत्तांना नियमित कर

महापालिका आयुक्तांचा निर्णय; दुप्पट करापासून सुटका
Belgaum municipal corporation
Belgaum municipal corporationPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शहरातील अनधिकृत मालमत्तांना दुहेरी मालमत्ता कर आकारण्यात येतो. पण आता शहरात ज्या अनधिकृत मालमत्तांना बी खाता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना दुप्पट करापासून सुटका झाली असून त्यांच्याकडून अधिकृत मालमत्तांप्रमाणेच कर आकारणी करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या व्याप्तीत सुमारे 38 हजार अनधिकृत मालमत्ता आहेत. त्यांच्याकडून मालमत्ता कर दुपटीने आकारला जातो. त्याशिवाय बांधकाम परवान्यासाठी कर आकारणी करण्यात येते. त्यामुळे, लोकांत संताप व्यक्त करण्यात येत होता. या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली होती. नगरसेवकांनी यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तरीही दुप्पट कर आकारणी करण्यात येत होती. त्यामुळे, सरकारनियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी आणि विरोधी पक्ष नेते सोहेल संगोळ्ळी यांनी आयुक्त कार्तिक एम. यांच्या कक्षासमोर आंदोलन केले होते. त्याची दखल घेत आयुक्त कार्तिक यांनी शहरात ज्या अनधिकृत मालमत्ताधारकांनी बी खाता प्रमाणपत्र घेतले आहे. त्यांच्याकडून दुप्पट कर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या बी खाता प्रमाणपत्र असलेल्या मालमत्ताधारकांनी नियमीत कर भरणा करावा, आपापल्या प्रभागातील महसूल निरिक्षकांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या अनधिकृत मालमत्ताधारकांनी बी खाता प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांनीही नियमित कर भरण्याबाबत शासनाचा आदेश आहे का, याची चाचपणी करण्यात येईल, असेही आयुक्त कार्तिक यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news