

अथणी : येथील अवटी मठ प्लॉटमधील चोरीप्रकरणी अथणी पोलिसांनी दि. 24 रोजी तिघांना अटक करून 20,40,000 रुपये किमतीचे 170 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. श्रेयस श्रीशैल मठपती, शिवकुमार परप्पा अरगोडी (दोघेही रा. अथणी), आणि अभिषेक गुरुपाद चौगले (रा. शेडाबाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, येथील महेश कुलकर्णी यांच्या घरातून 9 ते 11 ऑगस्टदरम्यान घरी कोणीही घरी नसताना चोरी करण्यात आली होती. चोरट्यांनी 170 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 5,00,000 रूपये लंपास केले होते. या घटनेचा तपास करत अथणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 20,40,000 रुपये किमतीचे 136 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपींना न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे
जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष हळ्ळूर, पीएसआय जी. एस. उप्पार, पीएसआय मल्लिकार्जुन तलवार यांच्या नेतृत्वाखाली तपास करून संशयितांना अटक करण्यात आली. या पथकात अथणी पोलिस ठाण्याचे कर्मचारी पी. बी. नाईक, श्रीमती जे. आर. असुदे, जे. एच. डांगे, ए. ए. मैगूर, डी. आय. धारीगौडा आणि बेळगाव येथील तांत्रिक विभागाच्या विनोधा ठक्कण्णावर यांचा समावेश होता.