

खानापूर : वनविभागाच्या सीआयडी पथकाने बसवन कुडची (ता. बेळगाव) येथील बसस्थानक परिसरात हत्तींच्या सुळ्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला सापळा रचून अटक केली.
बालाजी शंकरघट्ट शिवप्रकाश (28) रा. तावरघट्ट ता. भद्रावती जिल्हा शिमोगा याला अटक करण्यात आली. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला आहे. वनविभागाच्या सीआयडी पथकाचे डीएसपी एम. एस. नायकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. जोगन्नावर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत एस. आर. अरीबेंची, एल. एस. नाईक, एस. एस. रेड्डी. यु. आर. पट्टेद, बी. के. नागनुरी, एम. ए. नाईक, आर. बी. कोरीकोप यांनी सहभाग घेतला. वन्यजीवांची तस्करी आणि वनसंपत्तीच्या चोरट्या वाहतुकी संदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी 9480804133 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या सीआयडी पथकाने केले आहे.