Belgaum Loan Fraud : एपीएमसी व्यापाऱ्याला १७ लाखांचा गंडा

दोन कोटींच्या कर्जाचे आमिष; कर्जासाठी अर्ज अन्य कंपन्यांकडे, प्रतिसाद भामट्यांकडून
Fraud
FraudPudhari News
Published on: 
Updated on: 

बेळगाव : एपीएमसी यार्डमधील एका व्यापाऱ्याला दोन कोटींचे कर्ज हवे होते. यासाठी त्यांनी काही फायनान्स कंपन्यांकडे अर्ज केला होता. याचाच फायदा उठवत मधेच घुसलेल्या सायबर भामट्यांनी आम्ही १ ते ५ कोटींचे कर्ज देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्याला तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या फसवणुकीची शुक्रवारी सीईएन पोलिसांत दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मूळचे कंग्राळी बीकेचा रहिवासी आणि एपीएमसी यार्डमध्ये व्यापारी असलेला विशाल या तरुणाला दोन कोटींचे कर्ज हवे होते. यासाठी त्यांनी बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल कंपनीसह अनेक ठिकाणी अर्ज केला होता. एप्रिलमध्ये त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्याने आपण क्लेव्हर कोड टेक सर्व्ह या फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. आम्ही १ कोटी ते ५ कोटींपर्यंत कर्ज देतो, असेही सांगितले.

शिवाय कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रे मागवून घेतली. तुम्हाला २ कोटींचे कर्ज हवे असेल तर आधी २० लाख रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असेही सांगितले. त्यानुसार विशाल याने त्यांच्या एचडीएफसी व ॲक्सिस बँक खात्यातून आधी १५ लाख रुपयांची रक्कम पाठवली. त्यानंतर भामट्याने दिलेल्या यूपीआय क्रमांकावर २ लाख ५० हजार रुपये दिले. यानंतर भामट्याने आपला फोन करत प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल यांनी १९३० क्रमांकावर फोन करून फिर्याद दिली. त्यानुसार शुक्रवारी शहर सीईएन पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.