Belgaum News: अमननगरात घरफोडी, दोन लाख लंपास

मुख्य गेट व घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश
theft case
theft casePudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : अमननगर परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी डल्ला मारला. मुख्य गेट व घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट उघडून दोन लाख रुपये लंपास केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार दि.२३ रोजी घरफोडीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी माळमारुती फिर्याद दाखल झाली असून पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामा देवला राठोड (रा. अमननगर, मूळ रा. गोवा) यांच्या घरात ही चोरी झाली. दि. १७ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत चोरट्यांनी घरफोडी केली. त्यांनी प्रथम घराच्या मुख्य गेटचा तसेच मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश करून कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेली दोन लाख रुपये लंपास केले. घरातील इतर साहित्‍यही विस्कटून टाकण्यात आले आहे. गुरुवारी घरमालक घरी आल्यानंतर दरवाजा तुटलेला व घरातील साहित्‍य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील रोकड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून परिसराची पाहणी केली. घरफोडीचा उलगडा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news