Belgaum Accident: जनगणना करताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

जनगणना करून घरी परतत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

कारवार : होसूर (ता. सिध्दापूर ) येथील एका शाळेतील शिक्षिकेला जनगणना करून घरी परतत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पूर्णिमा भट्ट (वय ४६) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.

पूर्णिमा गेल्या काही दिवसापासून जनगणनेच्या कामात व्यस्त होत्या. त्यांनी अहवाल अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी तो अहवाल काळ्या शाईत तयार करण्यास सांगून परत पाठविला होता. यामुळे त्या तो अहवाल पुन्हा सूचनेप्रमाणे पूर्ण करून दुचाकीवरून कार्यालयात आणत असताना ही घटना घडली.

त्या मळवती येथून दुचाकीवरून जात असताना अचानक दोन जनावरे त्यांच्या आडवी आली. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. नेमक्या त्याच वेळी मागून लाकडे भरून घेउन येणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह तालुका रुग्णालयात चिकित्सेसाठी आणला असता शिक्षक-शिक्षिकांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news