

खानापूर : बिडी (ता. खानापूर) येथील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने आलेली कार थेट हार्डवेअर दुकानात घुसल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुकानातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
आज शनिवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली. बिडी-कसबा नंदगड या रस्त्याला लागून असलेल्या कॉर्नरवर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट सागर पाटील यांच्या मालकीच्या साईकृपा हार्डवेअर व पेंट या दुकानात घुसली. यावेळी दुकाना समोर थांबलेली एक ग्राहक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. तथापि जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नंदगड पोलीस स्टेशनचे पीएसआय बळीगार व पीएसआय महानंदा, एन. ए. चंदरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कार घुसल्याने दुकानातील साहित्यांची मोडतोड झाली आहे. सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.