Belgaum Accident: अपघातात आई-वडिलांसह मुलगा ठार

रिक्षाची दुचाकीला धडक; 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

रायबाग : रायबाग स्टेशन परिसरात रिक्षा व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महांतेश अशोक माने (वय २७), साक्षी महांतेश माने (२३) हे दाम्पत्य व त्यांचा मुलगा समर्थ महांतेश माने (९) यांचा या अपघातात मृत्यू झाला. चेतन महांतेश माने (९ महिने) हा गंभीर जखमी झाला आहे.

महांतेश माने कुटुंबासह बोमनाळहून रायबागकडे दुचाकीने जात असताना रायबागहून हारुगेरीकडे जाणाऱ्या मालवाहू रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक बसली यामध्‍ये तिघांचा मृत्‍यू झाला तर नऊ महिन्‍यांचे बालक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली असून सीपीआय व पोलिस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news