Belgaum Accident : कारची झाडाला धडक; युवक ठार

चौघे गंभीर : निपाणी-अकोळ मार्गावर अपघात; कारचा चक्काचूर
Belgaum Accident : कारची झाडाला धडक; युवक ठार
Published on: 
Updated on: 

निपाणी : निपाणी-अकोळ मार्गावर हालसिद्धनाथ मंदिरनजीक वळणावर निपाणीहून अकोळकडे जाणाऱ्या कारचालकाचा ताबा सुटून बाजूच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील युवक ठार झाला. सूर्यकांत रत्नसागर पानारी (वय २३, रा. अकोळ, ता. निपाणी) असे मृताचे नाव आहे. कारमधील अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर निपाणी व कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात बुधवारी रात्री १२ च्या सुमारास झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसांत झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, निपाणी येथील कारचालक विशाल मिलिंद बिरांजे (वय २४) हा अकोळ येथील सूर्यकांत पानारी यांना सोडण्यासाठी कारमधून मित्र संकेत सिद्धाप्पा मेदार (वय २२), ओंकार अतुल पळसे (वय २३) व राहुल (वय २३, रा. सर्वजण निपाणी) यांच्यासमवेत जात होता. त्यांची कार पाटील बंधू यांच्या शेताजवळ आली असता चालक विशाल याचा ताबा सुटला व कारची झाडाला धडक बसली. यात सूर्यकांत पानारी याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघांना गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी तातडीने धाव घेउन जखमींना उपचारासाठी हलविले. सूर्यकांतचे वडील रत्नसागर पानारी यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यकांतच्‍या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.