Belgaum Bike Theft : चोरल्या ४३ स्प्लेंडर, पोलिसांनी केले अंदर!

३० लाखांचा मुद्देमाल जप्त; संशयित खानापूर तालुक्यातील
Belgaum Bike Theft : चोरल्या ४३ स्प्लेंडर, पोलिसांनी केले अंदर!
Published on
Updated on

बेळगाव : एका आंतरजिल्हा दुचारी चोराला अटक करुन त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या ४३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व दुचाकी स्प्लेंडर कंपनीच्या असल्याने चोरटा स्प्लेंडरप्रेमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नारायण मनोहर कदम (वय ३२, रा. निडगल, ता. खानापूर) असे संशयिताचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून दुचाकी चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कित्तूरमधील एपीएमसी गेटजवळ १२ जानेवारी २०२६ रोजी पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी कित्तूर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करताना पोलिसांनी चोरीच्या दुचाकींचा काढण्यास सुरुवात केली. तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी एम. के. हुबळी शहरातील पारीश्वाड क्रॉसजवळ एक व्यक्ती क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपले नाव नारायण कदम असे सांगितले. कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीच्या अनेक घटनांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयिताने दिलेल्या माहितीनुसार त्याने कित्तूर, हिरेबागेवाडी, संकेश्वर, कलघटगी, यल्लापूर, सौंदत्ती, गदग, कुंदगोळ, हल्याळ, काकती, अंकलगी, धारवाड ग्रामीण आणि हुबळी परिसरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. त्याच्याकडून एकूण ४३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत ३० लाख रुपये आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील २५, बेळगाव शहर ८, धारवाड जिल्ह्यातील ६, हुबळी-धारवाड १, गदग जिल्ह्यातील २ आणि कारवार जिल्ह्यातील २ दुचाकींचा समावेश आहे.

संशयित कदमला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. चौकशी व चोरीच्या वाहनांची जप्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला ७ ऑगस्ट रोजी कित्तूर येथील दिवाणी व जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करुन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news