Belgaum House Burglary : बंद घर फोडून ३५ लाखांचा ऐवज लंपास

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रकमेवर डल्ला
House Burglary
House Burglary Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बैलहोंगलमधील विनायकनगरमध्ये गुरुवारी (दि. २०) सकाळी ही घटना उघडकीस आली. यल्लालिंग तोकलवर यांच्या घरी ही चोरी झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मूळचे गोकाक तालुक्यातील शिलतीभावी येथील रहिवासी असलेले तोकलवर कामानिमित्त बैलहोंगलमध्ये वास्तव्यास आहेत. ते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. प्राथमिक माहितीनुसार, २३ तोळ्याचे सोन्याचे दागिने, सुमारे १४ तोळ्याचे चांदीचे दागिने आणि १.२० लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ३५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

चोरट्यांनी मुरगोड रोडवरील बसवनगर परिसरातील आणखी दोन बंद घरांनाही लक्ष्य केले. तेथे चोरीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र हाती काहीही न लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ, उपनिरीक्षक प्रमोद यलिगार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.