Belgaum News : नियमबाह्य बियाणे-खत विक्रीची २७३ प्रकरणे

सहा महिन्यांतील राज्यातील आकडेवारी; कृषी खात्याच्या दक्षता विभागाकडून कारवाई
Fertilizer
FertilizerPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : नियमांचे उल्लंघन करून बियाणे, रासायनिक खते तसेच कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरोधात कृषी खात्याच्या दक्षता विभागाने राज्यभर कठोर कारवाई केली आहे. या आर्थिक वर्षातील सप्टेंबरअखेरपर्यंत अशा प्रकारची एकूण २७३ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यांतर्गत १०.३२ कोटी रुपये किमतीचे ३३० क्विंटल बियाणे, १,११४ टन रासायनिक खते व ९,००५ लिटर कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.

गत सहा महिन्यांत दाखल २७३ पैकी ५८ प्रकरणांमध्ये अंतिम निकाल लागला असून संबंधितांना १८.२३ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या जैविक उत्पादने बाळगल्याच्या आरोपाखाली सात प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. एकूण ४६ परवाने निलंबित करण्यात आले असून तीन परवाने रद्द करण्यात आले आहेत. शिवाय ३७ तक्रारींचा निपटारा करुन तपास अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.

गेल्या चार वर्षांत (२०२३-२४ ते २०२६-२७) एकूण ४२.५७ कोटी रुपये किंमतीची कृषी निविष्ठा जप्त केली असून न्यायालयात एकूण १,४२० प्रकरणे दाखल केली आहेत. अनधिकृतपणे बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध १२४ प्रकरणे दाखल करुन ३.०६ कोटी रुपये किमतीचे १,६०३ क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले आहे. रासायनिक खत विक्रेत्यांविरुद्ध ५८२ प्रकरणे दाखल करुन २२.४३ कोटी रुपये किंमतीचे ४,५०५ टन रासायनिक खत जप्त करण्यात आले आहे. नियमबाह्य पद्धतीने कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध ७१४ प्रकरणे दाखल करुन १७.०८ कोटी रुपये किंमतीचे ६ लाख ३९ लाख २८८ लिटर कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे.

जैविक उत्पादनांमध्ये बेकायदेशीररीत्या कीटकनाशकांचे घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर १०५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. दक्षता विभागाने दाखल केलेल्या एकूण ३७८ प्रकरणांमध्ये न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून दोषी उत्पादक व विक्रेत्यांना १ कोटी २ लाख ५३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १८१ परवाने निलंबित तर ११७ परवाने रद्द केले आहेत.

विविध माध्यमांतून एकूण १, ०८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,०२८ तक्रारींचा निपटारा करुन सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. केवळ ६० प्रकरणांचा तपास सुरु असल्याची माहिती कृषी खात्याच्या दक्षता विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news