Ration card changes: 14 लाख बीपीएल आता एपीएल होणार

अपात्र लाभार्थ्यांकडे असणारी राज्यातील 14 लाख बीपीएल रेशनकार्डे एपीएल करण्यात येणार आहेत
Ration card news
Ration card newsPudhari
Published on
Updated on

बेळगाव : अपात्र लाभार्थ्यांकडे असणारी राज्यातील 14 लाख बीपीएल रेशनकार्डे एपीएल करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आहार आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी दिली. नियमांना तिलांजली देत 7 लाख कुटुंबांना बीपीएल रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारने राज्याला दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

पात्र कुटुंबांवर अन्याय करण्यात येणार नाही. त्यांच्याकडे कायमस्वरुपी बीपीएल कार्डे ठेवण्यात येतील. परंतु, सरकारची फसवणूक करुन बेकायदेशीरपणे बीपीएल रेशनकार्ड घेणाऱ्यांची कार्डे टप्प्याटप्याने रद्द करण्यात येतील, असे मंत्र्यांनी सांगितले. एखाद्या पात्र बीपीएल कार्डधारक कुटुंबांचे कार्ड एपीएल केले असल्यास त्यांना पुन्हा बीपीएल कार्ड देण्याची सोय करण्यात आली आहे. अशा कुटुंबांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा. त्यानंतर त्या कुटुंबांना बीपीएल रेशन कार्ड देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news