Belgaum Accident: मिनी बसच्या धडकेत सफाई कामगार महिलेचा बळी

नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी रस्ता साफ करताना मिनी बसने धडक दिल्याने महापालिकेची सफाई कामगार असलेली महिला ठार झाली
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी रस्ता साफ करताना मिनी बसने धडक दिल्याने महापालिकेची सफाई कामगार असलेली महिला ठार झाली. तिसरे रेल्वे फाटक ओव्हरब्रीजशेजारच्या केबी सिरॅमिक्सजवळ शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. आवाक्का सुरेश कोलकार (वय 48, रा. आंबेडकर गल्ली, हंगरगा) असे मृत महिलेचे नाव आहे.

आवाक्का नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी रस्ता साफ करत होती. आरपीडी चौकाकडून पिरनवाडीकडे टेम्पो (केए-22 ए-0611) भरधाव निघाला होता. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पोची जोराची धडक आवाक्काला बसली. त्या रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. रहदारी दक्षिण विभाग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. निरीक्षक बसगौडा पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news