

बेळगाव : बेळगाव ते तिरुचिनापल्ली खास रेल्वे सुरु करण्याचे नियोजन नैऋत्य रेल्वेने केले आहे. रेल्वे क्र. 17075/17076 ही रेल्वे शनिवारी तिरुचिनापल्ली येथून निघणार असून ती रविवारी बेळगावला पोचणार आहे. या रेल्वेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून बेळगावमधून तिरुचिनापल्ली थेट जाण्याची सोय होणार आहे.
बळ्ळारी, हुबळी, गदग, धारवाड आणि लोंढा या रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे. सध्या हमसफर रेल्वे क्र. 22497 ही रेल्वे बुधवारी दुपारी 2.50 वाजता बेळगावला येते. तर बेळंकवी एक्सप्रेस रेल्वे क्र. 17315 ही रेल्वे सकाळी 11.50 वाजता बेळगावला येेते. बेळगाव ते तिरुचिनापल्ली थेट रेल्वे नव्हती. ती आता सुरु होणार असून लवकरच त्या रेल्वेचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने दिली.