Belgaum Accident: मालवाहू वाहनांच्या धडकेत तिघे ठार

कित्तूर, यमकनमर्डी, घटप्रभा हद्दीतील दुर्घटना
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघेजण ठार झाले. मालवाहू वाहनांनी धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद यमकनमर्डी, घटप्रभा व कित्तूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अंबडगट्टीजवळ मालवाहू वाहनाने धडक दिल्याने वृद्ध ठार झाले. शंकरय्या चन्नबसय्या करीमठ (वय ७६, रा. अंबडगट्टी, ता. कित्तूर) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. ते चालत जात असताना बेळगावहून धारवाडकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रूग्णालयात नेले असता त्यांचा दहाच्या सुमारास मृत्यू झाला. कित्तूर पोलिसांत नोंद झाली आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाणा हद्दीत दुचाकीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने एकजण ठार झाले. अडिव्याप्पा काडप्पा मावनुरी (वय ४०, रा. कुरणीवाडी, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. सदर दुचाकीस्वार अडिव्याप्पा हे २६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हत्तरगी टोलनाक्याजवळ अंडरब्रीजखालून सर्व्हीस रस्त्याला चुकीच्या दिशेने जात होते. यावेळी पिकअप वाहन देखील चुकीच्या दिशेने येत होते. दोन्ही वाहनांची समोरासर धडक होऊन जोराची धडक झाली. यामध्ये अडिव्याप्पा हे जागीच ठार झाले.

तिसरा अपघात घटप्रभा पोलीस ठाणा हद्दीत झाला. मृत अमीर बशीर चिनगी (वय ४५, रा. घटप्रभा, विद्यानगर, गोकाक) हे त्यांच्या दुचाकीवरून कल्लोळी संगनकेरी मार्गावरून २६ रोजी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या वाहनाने जोराची धडक दिली. त्यानंतर हे अवजड वाहन तसेच भरधाव निघून गेले. यामध्ये अमीर हे जागीच ठार झाले. या प्रकरणी घटप्रभा पोलिसांनी हिट ॲन्ड रनची नोंद करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news