Belagavi vehicle theft: चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक

चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक करण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले
Belagavi vehicle theft: चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक
Published on
Updated on

बेळगाव : चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक करण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे. लक्ष्मण विरुपाक्षी कणबर्गी (वय ३१, रा. एम. मल्लापूर रोड, गोकाक) असे संशयिताचे नाव आहे.

सदर तरुणाने बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या असून त्याची किंमत २ लाख ५५ हजार रुपये होते. हिरेबागेवाडीचे पोलिस निरीक्षक एस. के. होळेण्णावर, उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प, उपनिरीक्षक बी. के. मीटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news