

बेळगाव ः दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची तपासणी सुरू आहे. दुरूस्तीसाठी 22 जानेवारी ही अंतिम तारीख दिली आहे. त्यानंतर तारीख वाढविली जाणार नाही. त्यानंंतरही काही चुका झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहील, असे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.
राज्यातील सुमारे 9 लाख 1 हजार 80 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. हे अर्ज आता तपासले जात आहेत. भविष्यात माहीती चुकीची निघाल्यास संबंधित शाळेतील मुख्याध्यापक जबादार असणार आहे. त्यामुळे संकेतस्थळावर जाऊन ाऊनलोड स्टुडंट इन्फॉर्मेशन या पर्यायातून माहिती डाऊनलोड करून घ्यावी आणि त्या माहितीची पुन्हा एकदा पालकांकडून ़खातरजमा करून घ्यावी, अशी सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांची माहिती अंतिमे म्हणून सादर करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.