PM Kusum Yojana: कृषी विजेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प; पंतप्रधान कुसुम योजना जारी

जिल्ह्यातील ३९ गावांची निवड
solar energy project
solar energy projectpudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : शेतीसाठी लागणारी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान कुसुम (शेतकरी उर्जा सुरक्षितता व उन्नतीसाठी महाअभियान) योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव तालुक्यातील दोन व खानापुरातील चार गावांसह जिल्ह्यातील ३९ गावांची निवड केली आहे.

योजनेसाठी ९७२ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार नाही. तर सरकारी गायरान, पड किंवा सरकारी जमिनीचा वापर केला जाणार आहे. महसूल खात्याने ऊर्जा खात्याकडे सदर जमीन वर्ग केली आहे. त्याठिकाणी लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. काही गावांमध्ये एकाच ठिकाणी तर काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्माण करण्यात येईल.

योजनेसाठी निवड झालेल्या गावांमध्ये बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, बडाल अंकलगी, खानापूर तालुक्यातील के. बागेवाडी, तोलगी, दोड्डहोसूर, इटगी, झुंजवाड (केबी), निपाणी तालुक्यातील कोगनोळी, यरनाळ (२), चिकोडी तालुक्यातील चिंचली, सदलगा, खाजगौंडहट्टी, केरुर (२), इटनाळ, रायबाग तालुक्यातील सुलतानपूर (३), हंदिगूंद, मेखळी (२), बस्तवाड (४), सुटटी, अथणी तालुक्यातील मलाबाद, कागवाड तालुक्यातील ऐनापूर, केंपवाडबैलहोंगल तालुक्यातील पट्टीहाळ (केबी), यरगोप्प, सुतगट्टी, कडगट्टी, कितूर तालुक्यातील कितूर (२), चिक्क नंदिहळ्ळी, देमट्टी, रामदुर्ग तालुक्यातील बटकुर्की, ओबळापूर, तिमापूर, मुडलगी तालुक्यातील आरभावी, गोकाक तालुक्यातील ममदापूर, गोकाक (२), खणगाव, सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी (२), होसूर गावांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news